Wednesday, 15 November 2023

दिवाळीअभ्यास

 🪭🏮🪭🪭🪭🏮🪭🪭🪭🏮🪭

🔮🥳 *दिवाळीअभ्यास*🎇🔮


🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸


🌀 *इयत्ता १ ली दिवाळी अभ्यास*🌀


https://bit.ly/3QMcTy8


🌀 *इयत्ता  २ री दिवाळी अभ्यास*🌀


https://bit.ly/3MusXCu


🌀 *इयत्ता ३ री दिवाळी अभ्यास*🌀


https://bit.ly/3SmVg9y


🌀 *इयत्ता ४ थी दिवाळी अभ्यास*🌀


https://bit.ly/3FL0fJB


🌀 *इयत्ता  ५ वी दिवाळी अभ्यास*🌀


https://bit.ly/3QosT8g


🌀 *इयत्ता ६ वी दिवाळी अभ्यास*🌀


https://bit.ly/3QhMAOU


🌀 *इयत्ता ७ वी दिवाळी अभ्यास*🌀


https://bit.ly/3QsZxG1


🌀 *इयत्ता ८ वी दिवाळी अभ्यास*🌀


https://bit.ly/40qUQRj


🌀 *इयत्ता ९ वी दिवाळी अभ्यास*🌀


https://bit.ly/3FPSfXC


🌀 *इयत्ता १० वी दिवाळी अभ्यास*🌀


https://bit.ly/49oBjp2


🏮 *जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शेअर करा...🏮*

🙏 घनशाम केशवराव अरमळ

८८३०७६७३१२

मोर्शी 

Wednesday, 23 August 2023

चंद्रयान थेट प्रक्षेपण

 https://ghanshamarmal.blogspot.com/2023/08/blog-post.html

आज संध्याकाळी 5:45 पासून 18 मिनिटांचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. त्या 18 मिनीटातले अत्यंत कठीण टप्पे जे तुम्ही लाईव्ह बघाल ते पुढील प्रमाणे .. 5:47 मिनिटांनी ही प्रक्रिया चालू होईल. अत्यंत क्लिष्ट गोष्टी किंवा algorithm न पाहता सोप्या भाषेत उद्या जे होणार आहे ते समजून घेऊ. वरील तक्ता ज्यांना समजेल त्यांना हे वाचण्याची गरज नाही. isro, moon,





1.रफ ब्रेकिंग फेज


25x134 km कक्षेत फिरणारे चांद्रयान जेव्हा 30 km उंचीवर असेल तेव्हापासून त्याचा प्रचंड  Horizontal वेग 1.68km/sec वरून almost 0.2km/sec इतका  कमी करण्यात येईल. चांद्रयानावरील 12 पैकी 4 इंजिन  800 न्यूटनचा thurst यासाठी वापरतील. ह्या मध्ये यान 30 km उंची वरून  7.42 km उंचीवर येईल. आणि त्याच वेळी लँडिंग साईट कडे 713.5 km सरकेल. साधारण 690 सेकंदाची ही फेज असेल .


 2.   Atitude Holding फेज*


"Atitude" not "Altitude" .. जेव्हा यान 7.42km उंचीवर येईल तेव्हा ही 10 सेकंदाची फेज असेल. यात पहिल्यांदा Hotizontal Lander हा Vertical position मध्ये आणण्यात येईल. यात यान 3.48 km सरकेल आणि त्याची उंची चंद्राच्या पृष्ठभागापासून 7.42 वरून 6.8 km करण्यात येईल.

यात horizontal वेग 336m/sec आणि खाली येण्याचा वेग हा 59m / sec करण्यात येईल.


3.  Fine ब्रेकिंग फेज(isro, moon,)


175 सेकंदाची ही प्रक्रिया असेल. यात यान 28.52 km लँडिंग साईट कडे सरकेल. याच फेज मध्ये यान पूर्ण Vertical करण्यात येईल. यानाची उंची 6.8 km वरून 800/1000 मीटर इतकी कमी करण्यात येईल. यावेळी सगळे सेन्सर चेक केले जातील. 150 मीटर उंचीवर hazard analysis करण्यात येईल म्हणजेच उतरण्या योग्य जमीन आहे का खड्डे आहेत हे तपासण्यात येईल. यासाठी Lander Hazard Detection and Avoidance Camera (LHDAC) वापरण्यात येईल.  योग्य नसेल तर यान 150 मीटर आजूबाजूला जागा शोधू शकेल. 


 4.टर्मिनल डीसेंट फेज


हीच ती फेज ज्या मध्ये आपले स्वप्न पूर्ण होईल. Lander चंद्र भूमीला स्पर्श करेल. 2m/sec या वेगाने यान चंद्रावर उतरेल. या फेज मध्ये चांद्रयान 2 जाऊ शकले नव्हते. 6:04 मिनिट. हीच ती वेळ असेल 🙂.. या नंतर प्रग्यान रोव्हर बाहेर येईल . Lander आणि Rover एकमेकांचे फोटो काढतील. आणि देशात जल्लोष असेल. 🙂🙂 


5 मोटर्स न वापरता 4 मोटर या वेळी बसवण्यात आल्या आहेत. एका मोटरच्या वजना इतके जास्त इंधन यावेळी यानाला देण्यात आले आहे. 


ह्या वेळी यान हे Failure based बनवले गेले आहे म्हणजेच सगळे सेन्सर fail झाले, algorithm चुकली तरी यान चंद्रावर उतरेलच याची दक्षता घेण्यात आली आहे. यश या वेळी आपलेच आहे. 🙂🙏🏽

🇮🇳 चांद्रयान 3 पुढील वेळेत चंद्रावर उतरेल. हा थरार पुढील ठिकाणी आपण लाईव्ह बघू शकता. August 23, 2023, around 18:04 Hrs. IST.


ISRO Website 

https://isro.gov.in


YouTube 

https://youtube.com/watch?v=DLA_64yz8Ss


Facebook 


https://facebook.com/ISRO


DD National TV

from 17:27 Hrs. IST on Aug 23, 2023

Monday, 29 May 2023

ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ करिता नोंदणी सुरू…..

 

https://ghanshamarmal.blogspot.com/2023/05/blog-post.html

ऑनलाईन वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण २०२३-२४ करिता नोंदणी सुरू…..




वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षणाचे नियोजन व संनियंत्रणाची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडे सोपविण्यात आलेली आहे. यानुसार २०२१-२०२२ दरम्यान ऑनलाईन स्वरूपामध्ये एकूण ९४.५४२ प्रशिक्षणार्थी यांनी प्रस्तुत प्रशिक्षण पूर्ण केले आहे. सद्यस्थितीमध्ये संदर्भ क्रमांक ३ अन्वये शासनामार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा द्वितीय टप्प्याची प्रक्रिया सुरु करणेसाठीची मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे. सदरील पोर्टलवर प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय या चार गटातील पात्र शिक्षक/ मुख्याध्यापक / प्राध्यापक / प्राचार्य यांनी नोंदणी करावयाची आहे. यासंदर्भातील सूचना पुढीलप्रमाणे-

१. प्रशिक्षणाकरिता नोंदणी करणेसाठी परिषदेच्या https://raining scoltmaha.nic.in या संकेतस्थळास भेट द्यावी. तसेच परिषदेच्या www.mas.ac.in या संकेतस्थळावर देखील सदरचा सर्व तपशील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.

२. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण १२ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच १२ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील.

३. दि. ३१ मार्च, २०२४ रोजी सेवेचे एकूण २४ वर्षे सेवा पूर्ण होणारे किंवा त्यापूर्वीच २४ वर्षे सेवा पूर्ण झालेले प्रशिक्षणार्थी निवड श्रेणी प्रशिक्षण नोंदणीसाठी पात्र ठरतील. 

४. प्रशिक्षण नोंदणी दिनांक २९ मे, २०२३ ते १२ जून, २०१३ पर्यंत सुरु राहणार आहे. प्रशिक्षण लिंक नोंदणी दिनांक २९ मे, २०१३ रोजी दुपारी २.०० वाजेपासून सुरु होईल. ५. सदरचे प्रशिक्षण हे ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. याबाबत नोंदणीनंतर नोंदणी केलेल्या ई-मेलवर

या कार्यालयामार्फत ई-मेलद्वारे प्रशिक्षणाबाबत पुढील सूचना संबंधितांना देण्यात येतील. ६. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी पुढीलप्रमाणे ०४ गट करण्यात आलेले आहेत

गट क्र. १- प्राथमिक गट (इ. १ ली ते ८ वी च्या वर्गाना अध्यापन करणारे) गट क्र. ३- उच्च माध्यमिक गट (इ. ११ वी ते १२ वी च्या वर्गांना अध्यापन करणारे)

गट क्र. ४- अध्यापक विद्यालय गट (प्रथम व द्वितीय वर्ष अध्यापन करणारे)

७. प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करतेवेळी शिक्षकाने आपला स्वतःचा शालार्थ ID, शाळेचा UDISE क्रमांक, अचूक ई-मेल आय. डी इत्यादी माहिती सोबत ठेवावी.

८. ज्या शिक्षकांना स्वतःचा शालार्थ ID उपलब्ध नाही अशा शिक्षकांसाठी देखील सदरच्या ऑनलाईन पोर्टलवर “शालार्थ आय. डी. नसलेल्या शिक्षकांसाठीची नोंदणी हा पर्यायाचा वापर करून आपली

नावनोंदणी करावी.

९. नावनोंदणी करत असताना नोंदणीसाठीचा आवश्यक OTP आपल्या मोबाईल क्रमांकावर तात्काळ

येणार असल्याने आपला कार्यान्वित असणारा मोबाईल सोबत ठेवावा.१०. प्रशिक्षणार्थी यांच्याकडे स्वतःचा वापरात असणारा ई-मेल आय. डी. असणे आवश्यक आहे. सदरच्या प्रशिक्षणाचे पुढील सर्व पत्रव्यवहार व सूचना या नावनोंदणी करत असताना नोंदविलेल्या ई-मेल आय.डी. वर पाठविण्यात येतील.

११. आपण नोंदणी करत असलेला ई-मेल आयडी पडताळणीसाठी सदरच्या ई-मेल आयडी वर OTP येईल. व सदरचा प्राप्त OTP दिलेल्या प्रणालीवर नोंदवून आपला ई-मेल आयडी अचूक असल्याची पडताळणी केली जाईल.

१२. नावनोंदणी करत असताना आपला ई-मेल आय.डी अचूक असल्याची खात्री करावी. चुकीचा ई-मेल आय.डी./ यापूर्वी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वरील कोणत्याही प्रशिक्षणासाठी वापरण्यात आलेला ई-मेल आय.डी चा वापर करू नये अन्यथा प्रशिक्षणार्थ्याचे प्रशिक्षण सुरु होणेसाठी समस्या उद्भवेल.

१३. नोंदणी फॉर्म अंतिम करण्यापूर्वी आपली भरलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक पडताळणी करण्यात यावी. आपल्या माहितीमध्ये काही बदल / दुरुस्ती असल्यास “माहितीत बदल करा” या बटणावर क्लिक करून

सुधारित माहिती भरता येईल.

१४. प्रस्तुत प्रशिक्षणासाठी आवश्यक शासन निर्णय व मार्गदर्शनपर आधारित सर्व व्हिडीओ

https://training.scertmaha.ac.in या पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तसेच प्रशिक्षणाशी निगडीत अद्ययावत सूचना वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

१५. या प्रशिक्षणासाठी जिल्हा नोडल अधिकारी म्हणून संबंधित जिल्ह्याचे प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण

संस्था हे असतील तर मुंबई शहर व उपनगर या जिल्ह्यांसाठी उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण. मुंबई हे जिल्हा नोडल अधिकारी असतील.

१६. प्रशिक्षण शुल्क भरणा करणेसाठी प्रशिक्षणार्थी यांचेकडे स्वतःच्या बँक खात्याचा सर्व तपशील इंटरनेट बँकिंग / क्रेडीट / डेबिट कार्ड / UPI payment ने सदर प्रशिक्षण शुल्क ज्या बँक खात्यावरून भरणार आहे त्याचा आवश्यक तपशील सोबत ठेवावा. उदा. युझर आयडी, पासवर्ड इ.

१७. सदर प्रशिक्षण सशुल्क असल्याने प्रति प्रशिक्षणार्थी रु.२,०००/- (अक्षरी रुपये दोन हजार मात्र शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Credit & Debit Card Internet Banking, UPI Payment) अदा करणे आवश्यक आहे. एकदा भरण्यात आलेल्या प्रशिक्षण शुल्क परताव्याबाबत परिषदेशी कोणताही पत्रव्यवहार करू नये. त्यामुळे सदर प्रशिक्षण शुल्क भरताना प्रशिक्षणार्थ्यांनी स्वतःची माहिती काळजीपूर्वक भरावी.

१८. प्रशिक्षण नावनोंदणी प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्यानंतर नावनोंदणी ची रीसिप्ट अथवा स्क्रीनशॉट जतन करून ठेवावा म्हणजे भविष्यातील दुबार नोंदणी, ई-मेल, प्रशिक्षण गट / प्रशिक्षण प्रकार बदलासाठी ग्राह्य धरण्यात येतात.

१९. नोंदणी अर्ज भरताना काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास स्वतःच्या रजिस्टर Email आय.डीवरून trainingsupport@maa.ac.in या ई-मेल आयडीवर संपर्क करावा. २०. वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी व निवड श्रेणीसाठी पात्र होणेकरिता विहित गटातील संदर्भीय शासन

निर्णयातील प्रशिक्षण पूर्ण करणे ही एक अट आहे. केवळ प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे संबंधित शिक्षक

वरिष्ठ / निवड श्रेणीसाठी पात्र ठरणार नाहीत. त्याकरिता उपरोक्त शासन निर्णयातील इतर नमूद

अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे.

२१. नोंदणी केलेल्या शिक्षकाचे उपरोक्त प्रशिक्षण गटनिहाय प्रशिक्षणाचे नियोजन करण्यात येईल.

२२. शासन निर्णयातील अटी व शर्ती तपासून त्याबाबत वरिष्ठ / निवडश्रेणी मंजूर करण्याची कार्यवाही विभागीय / जिल्हा स्तरावर करण्यात येईल.

२३. सदरचे ऑनलाईन प्रशिक्षण पूर्ण केले म्हणजे वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय झाला असे नाही तर जिल्हास्तरावरील सक्षम प्राधिकारी यांचेमार्फत पुढील प्रशासकीय कार्यवाही यादृष्टीने केली जाईल

याची नोंद घेण्यात यावी.

२४. सदर प्रशिक्षणासंबंधी अद्ययावत माहितीसाठी वेळोवेळी https://training.scertmaha.ac.in हे संकेतस्थळ पहावे.

उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षक संवर्गातील संबंधितांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्याव्यात व सदर प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना नावनोंदणी करण्यास आदेशित

करण्यात यावे. प्रशिक्षणाच्या अधिकच्या समन्वयासाठी परिषदेतील खालील क्रमांकावर संपर्क साधावा..

१. श्री. योगेश सोनवणे, उपविभागप्रमुख, मो. क्र. ९१४५८२५१४४ २.

श्री. अभिनव भोसले, विषय सहाय्यक, मो. क्र. ७७२२०७४२९६

पत्र वाचा

Friday, 30 December 2022

Solar Panel Subsidy

 https://ghanshamarmal.blogspot.com/2022/12/blog-post.html

Solar Panel Subsidy: अनुदानासह घरपोच सौर पॅनेल बसवा! 25 वर्षे वीज बिल भरावे लागणार नाही


National Portal for Rooftop Solar: केंद्र सरकार सौर पॅनेल बसविण्यासाठी Solar Panel Subsidy देत आहे. तुम्हीही तुमच्या घरात सोलर पॅनल लावून मोफत विजेचा आनंद घेऊ शकता.

सध्या देशात विजेचे संकट गंभीर बनले आहे. एकीकडे कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्यामुळे कमी प्रमाणात वीजनिर्मिती होत आहे. मात्र दुसरीकडे विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. विजेची कमी निर्मिती आणि मागणी जास्त यामुळे आम्हाला वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. पण सौरऊर्जेच्या माध्यमातून तुम्ही या वीज संकटावर सहज मात करू शकता.

सोलर पॅनल सबसिडीसाठी येथे ऑनलाइन अर्ज करा

तुमच्या घरात सोलर पॅनल बसवून तुम्ही सहज वीज निर्माण करू शकता. सोलर पॅनलपासून निर्माण होणारी ही वीज तुमच्या गरजा पूर्ण करू शकते. सौर पॅनेल बसवण्यासाठी सरकार मदत (सोलर सबसिडी) देत आहे. सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येतो? यासाठी केंद्र सरकार किती सबसिडी देते, सोलर पॅनमधून तुम्ही किती वीज निर्माण करू शकता हे आज आपण जाणून घेणार आहोत.

प्रथम वीज आवश्यकता निश्चित करा (First determine the power requirement)

म्हणजेच तुम्ही एका दिवसात किती वीज वापरू शकता. तुमच्याकडे किती विद्युत उपकरणे आहेत यावर अवलंबून तुम्हाला दिवसभरात किती वीज लागेल हे ठरवता येते. समजा तुमच्याकडे दोन ते तीन पंखे, एक फ्रीज, सहा ते सात एलईडी बल्ब आणि एक टीव्ही अशी विद्युत उपकरणे असतील तर तुम्हाला एका दिवसात 6 ते 8 युनिट विजेची गरज भासू शकते. त्यानुसार, तुम्ही तुमच्या घरात बसवल्या जाणार्‍या सोलर पॅनलची किंमत ठरवू शकता. (Government solar panel scheme 2022)

कमी सिबिल स्कोअरसाठी वैयक्तिक कर्ज कसे मिळवायचे? पहा सविस्तर माहिती

केंद्र सरकारकडून अनुदान (Solar Panel Subsidy)

केंद्र सरकारकडून सध्या अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या वापराला प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्राने सोलर रूफ टॉप योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला केंद्र सरकारकडून सोलर पॅनल बसवण्यासाठी सबसिडी दिली जाते. सर्वप्रथम, तुमच्या डीलरकडून सोलर पॅनेल खरेदी करा आणि ते तुमच्या घरात स्थापित करा. त्यानंतर अनुदानासाठी अर्ज करा. तुम्ही तुमच्या घरी तीन किलोवॅटचे सोलर पॅनल लावले तर त्यामुळे सरकार तुम्हाला चाळीस टक्क्यांपर्यंत सबसिडी देते. तुम्ही तुमच्या घरी 10 किलोवॅटचे सोलर पॅनल लावल्यास तुम्हाला 20 टक्के सबसिडी मिळते. (Pradhan Mantri Solar Panel Yojana 2022)

सौर पॅनेलची किंमत किती आहे? (How much does solar panel cost?)

तुम्हाला तुमच्या घरी दोन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवायचे असतील, तर त्यासाठी सुमारे एक लाख वीस हजार खर्च येईल. पण यावर तुम्हाला चाळीस टक्क्यांपर्यंत सबसिडी मिळते. म्हणजेच अनुदान वगळून दोन किलोवॅट सोलर सिस्टिमची एकूण किंमत ७२,००० रुपये आहे. एकदा तुम्ही तुमच्या घरात सोलर पॅनल लावले की, तुम्ही पुढील 25 वर्षे वीज बिलापासून मुक्त होऊ शकता. तसेच, तुमच्या घरात चोवीस तास वीज उपलब्ध होऊ शकते. (Free Solar Panel Registration)

🙏🏻 घनशाम केशवराव अरमळ 

८८३०७६७३१२


Monday, 24 October 2022

 https://ghanshamarmal.blogspot.com/2022/10/blog-post_24.html

मेडिकल प्रवेशासाठी online पोर्टल सुरु 

ADMISSION START FOR Health Science Courses FOR ACADEMIC YEAR 2022-23


शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाने केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेसाठी (CAP) पोर्टल सुरू केलं आहे. सेल ल वकरच पोर्टलवर गृहराज्य आणि इतर राज्यातील उमेदवारांसाठी समुपदेशन प्रक्रिया जारी करणार आहे. जे एमएचटी सीईटी कॅप 2022 साठी पात्र झाले आहेत ते अधिकृत वेबसाइट – cetcell.mahacet.org वर पोर्टलवर प्रवेश करू शकणार आहेत.
Admission Process for Government / Government Aided/ Corporation/ Private Unaided
& Minority Institution for Health Science Courses in the State of Maharashtra will be carried out by
Commissioner & Competent Authority, State Common Entrance Test Cell, Mumbai.
This process will require NEET All India Rank of the candidate to be filled during the
Registration Process. Only NEET All India Rank needs to be filled up during the Online
Registration Process. No other Rank should be entered.
Filling up of the Online Registration

form with all the relevant information and necessary fees is mandatory for applying for admission to various health science courses including MBBS/ BDS/ BAMS/ BHMS/ BUMS/ BPTH/ BOTH/ BASLP/ B(P&O)/ B.Sc. (Nursing). Candidates not filling up the Online Registration Form shall not be considered for Admission to these courses.

केंद्रीकृत प्रवेश प्रक्रियेसाठी (CAP) पोर्टल अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक CLICK HERE

MBBS/ BDS/ BAMS/ BHMS/ BUMS/ BPTH/ BOTH/ BASLP/ B(P&O)/ B.Sc. (Nursing).

Provisional Seat Matrix for MBBS/BDS Courses in Govt./Govt. Aided/Corp./Private/Minority Medical/Dental Colleges – Group A New

माहिती पुस्तिका NEET UG – 2022 Information Brochure New

Provisional Seat Matrix for BPTH/BOTH/BASLP/BP&O/BSc.(Nursing) Courses in Govt./Govt. Aided/Corp./Private/Minority Colleges – Group C New

(राज्यातील शासकीय, शासन अनुदानित, महानगरपालीका, खाजगी विनाअनुदानित, अल्पसंख्याक महाविद्यालयांतील बीपीटीएच/बीओटीएच/बीएएसएलपी/ बी पी ॲन्ड ओ/बी.एस.सी. नर्सिंग अभ्यासक्रम जागांचे तात्पुरते जागा वाटत तक्ता)

🙏 

अमोल अरमळ  ८८३०७६७३१२

Saturday, 22 October 2022

निबंध

 माझा आवडता सण दिवाळी

अमोल अरमळ

My Favourite Festival Diwali in Marathi

दिवाळी सण हा माझ्या आवडत्या सणांपैकी एक आहे. दरवर्षी मी दिवाळीच्या सणाची आतुरतेने वाट पाहतो. दिवाळीचे ४-५ दिवस खूप आनंददायी आणि मनोरंजक असतात. हा ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो आणि हिंदूंचा एक महत्त्वाचा सण आहे.


दिवाळीची तयारी

दिवाळी जवळ आली की घरे, दुकाने स्वच्छ करून रंगरंगोटी केली जाते. खोल्या पूर्णपणे स्वच्छ आणि सजवल्या जातात, कारण अशी जुनी समजूत आहे की या दिवशी देवी लक्ष्मी घरात येते आणि तिच्या आशीर्वादाचा वर्षाव करते. या दिवशी आपण सर्व मातीचे दिवे मोहरीच्या तेलाने लावतो. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. या दिवसात बाजारपेठा नवनवीन वस्तूंनी भरलेल्या असतात आणि या दिवसात बाजारपेठांमध्ये खूप गर्दी असते. लोक त्यांच्या आवडीच्या वस्तू विकत घेतात आणि तीच मुलं स्वतःसाठी फटाके आणि नवीन कपडे घेतात आणि मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतात.


दिवाळीचा सण

धनत्रयोदशीचा सण दिवाळीच्या एक दिवस आधी येतो. धनत्रयोदशीच्या दिवशी बाजारपेठांमध्ये गर्दी असते. लोक भांडी, सोने, चांदी आदींची खरेदी करतात. दिवाळीच्या दिवशी आपण आपल्या घराच्या दारात रांगोळी काढतो आणि फुलांच्या हारांनी घर सजवतो. लोक या दिवशी नवीन कपडे घालतात आणि संध्याकाळी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करतात. देवी लक्ष्मी आपल्या घरी यावी म्हणून घराचे दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवल्या जातात. नंतर, प्रसाद घेतल्यानंतर, आम्ही टेरेस आणि खोल्यांमध्ये दिवे लावतो. सर्वत्र दिवे लावल्यानंतर, आम्ही गच्चीवर जातो आणि फटाके फोडण्याचा आनंद घेतो.


मला हा सण खूप आवडतो कारण या उत्सवात एक साधेपणा आहे. जेव्हा संपूर्ण कुटुंब एकत्र प्रार्थना करते तेव्हा मला ते आवडते. प्रसाद म्हणून लाडू खायला मिळतात. आजूबाजूला फक्त प्रकाश आहे जो अतिशय आकर्षक आहे.


दिवाळीनिमित्त माझ्या शाळेत रांगोळी स्पर्धा

दिवाळीच्या निमित्ताने रांगोळी काढण्याची प्रथा सर्रास सुरू आहे. दिवाळीच्या सुट्टीपूर्वी माझ्या शाळेत रांगोळी काढण्याची स्पर्धा आयोजित केली जाते. रांगोळी काढण्याची आवड असलेले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होतात आणि रांगोळी काढून आपली कला प्रदर्शित करतात. रांगोळी स्पर्धा एकट्याने किंवा गटात आयोजित केली जाते. या स्पर्धेसाठी विद्यार्थी खूप उत्सुक असतात आणि विद्यार्थी फुले, रंग, तांदूळ, पीठ इत्यादींच्या मदतीने आपली कला दाखवतात. विद्यार्थी आपल्या कौशल्याने विविध प्रकारच्या रंगीबेरंगी रांगोळ्या काढतात. सर्वोत्तम रांगोळी काढणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस दिले जाते.


या सणाबद्दल आपल्यामध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण होतो आणि आपल्यातील कलागुणांना बाहेर काढण्याची संधी मिळण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. या स्पर्धेनंतर आम्ही सर्व विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटपही करतो.


सण साजरे करण्यामागे धार्मिक श्रद्धा आहे

दिवाळीचा सण साजरा करण्यामागे अनेक धार्मिक कथा आहेत. भारत हा विविध सांस्कृतिक आणि धार्मिक श्रद्धांचा देश आहे, त्यामुळे दिवाळीचा सण साजरा करण्यामागे अनेक धार्मिक श्रद्धा आहेत. या सर्व विश्वासांपैकी सर्वात लोकप्रिय श्रद्धा म्हणजे भगवान श्री राम १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले. वनवासात रावणाने माता सीतेचे अपहरण करून तिला लंकेत नेले आणि भगवान रामाने रावणाचा वध करून सीतेला मुक्त केले आणि त्याच दिवशी अयोध्येला परतले. राम, सीता आणि लक्ष्मण अयोध्येत परतल्याच्या स्मरणार्थ लोक या दिवशी मोठ्या आनंदाने अयोध्याला सजवतात. अयोध्या नगरीत लोकांनी अत्यंत उदार मनाने रामाचे स्वागत केले होते.


जर आपण या सणाच्या सर्व समजुतींवर नजर टाकली तर आपण असे म्हणू शकतो की हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. दिव्यांचा सण हा आनंदाचा आणि अंधार आणि वाईटावर विजय मिळवण्याचा सण आहे. सदैव सत्य आणि चांगुलपणाचा मार्ग अवलंबला पाहिजे असा संदेशही हा सण देतो.


प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्यावर भर

आपण दरवर्षी दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करतो. या दिवशी अनेकजण फटाकेही पेटवतात. फटाक्यांमधून भरपूर धूर निघतो, त्यामुळे आपले वातावरण खूप प्रदूषित होते. फटाक्यांच्या धुरात अनेक हानिकारक पदार्थ असतात. यामुळे आपला एअर क्वालिटी इंडेक्स (AIQ) खालावतो, ज्यामुळे आपल्या आरोग्याला खूप नुकसान होते. फटाक्यांच्या या धुरामुळे आपले वातावरणही अत्यंत विषारी बनते, त्यामुळे पशु-पक्ष्यांचे खूप नुकसान होते. फटाक्यांमुळे होणाऱ्या आवाजाचा आपल्या मुलांवर, वृद्धांवर आणि प्राण्यांवर खोलवर परिणाम होतो.


निष्कर्ष

दिवाळीच्या या सणावर सर्व दुकाने, घरे, मंदिरे आणि आजूबाजूची सर्व ठिकाणे दिव्यांनी उजळून निघतात, ज्यामुळे खूप सुंदर दृश्य दिसते. देश-विदेशातील सर्व धर्माचे लोक हिंदूंचा हा प्रमुख सण मोठ्या थाटामाटात साजरा करतात. अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय म्हणूनही हा सण साजरा केला जातो.


✍️

घनशाम केशवराव अरमळ

८८३०७६७३१२

 जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक 

मराठी शाळा, तळणी