शैक्षणिक
https://ghanshamarmal.blogspot.com/2022/01/blog-post_21.html
आंतरजिल्हा बदली बाबत महत्वाची माहिती|शासनाकडून आलेल्या सूचना
दि.21जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत कि , जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत . शासन निर्णय दिनांक ७/४/२०२२ च्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आले आहे.
सन 2022 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत /आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सदर कंपनीने बदल्या बाबतची कार्यवाही करण्याकरता कार्यपद्धती सुरू केलेली आहे. सन 2022 मध्ये करावयाच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली यांकरिता शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनेनुसार आपल्या अधिपत्याखाली प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात खालील प्रमाणे माहिती ची पूर्तता करण्यासंदर्भात सुचविण्यात आले आहे .
1)(बिंदुनामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे.
२) रोस्टर तपासणी करून घेतल्यानंतर रोस्टर निहाय रिक्त पदांची यादी .
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली संदर्भात ऑनलाईन प्रक्रिया सुरु करत असताना खालील बाबींचा विचार करावा.
१) शिक्षणाचा हक्क अधिनियमातील तरतुदी विचारात घेऊन आंतरजिल्हा बदली करता पदोन्नत झालेल्या शिक्षकांनी स्वखुशीने पदावनत करण्याबाबत दिलेल्या संमती पत्राबाबत निर्णय घ्यावा.
२) संदर्भादिन शासन निर्णय सोबतच्या परिशिष्टातील अनुक्रम क्रमांक 6 येथे नमूद केल्यानुसार आंतर जिल्हा बदलीसाठी अर्ज करणारा शिक्षक स्थानिक अनुसूचित जमातीचा आहे किंवा कसे या बाबतची खात्री करूनच संमती देण्यात यावी.
वरील प्रमाणे कार्यवाही आपल्याकडून अद्याप झाली नसेल तर त्याबाबतची प्रक्रिया दिनांक 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता आपण घ्यावी.
आंतरजिल्हा बदलीचे परिपत्रक .
No comments:
Post a Comment