"Happy Republic Day 2022"
https://ghanshamarmal.blogspot.com
इतिहासात पहिल्यांदा अर्धा तास उशिरा सुरू होणार प्रजासत्ताक दिनाची परेड, काय आहे बरं कारण?
https://ghanshamarmal.blogspot.com
90 मिनिटांची असेल परेड
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की "कोविड-19 निर्बंधांमुळे परेडला उशीर होईल. याशिवाय परेड सुरू होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये प्राण गमावलेल्या सुरक्षा जवानांनाही श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. हा परेड सोहळा गेल्या वर्षीप्रमाणे 90 मिनिटांचा असेल. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) इंडिया गेटजवळील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील. यानंतर परेडमध्ये सहभागी होणारे दल मार्च करतील. ज्यात तिन्ही दलाचे जवान परेड करतील आणि देशाची सांस्कृतिक विविधता, सामाजिक आणि आर्थिक प्रगती दर्शविणारी चित्ररथ (Cultural scenes) दाखवले जाईल.
वरिष्ठ अधिकाऱ्याने पुढे सांगितले की "हे चित्ररथ लाल किल्ल्यापर्यंत जातील आणि तेथे सार्वजनिक प्रदर्शनासाठी उभी राहतील. परंतु मार्चिंग दल नॅशनल स्टेडियमवरच थांबतील. तसेच कोविड-19 संबंधित निर्बंधांमुळे प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही.
🙏 घनशाम के. अरमळ
No comments:
Post a Comment