Monday, 18 April 2022

महावितरणने सर्व वीज जोडण्या सुरू करण्याबाबत....

https://ghanshamarmal.blogspot.com/2022/04/blog-post.html

महावितरणने सर्व वीज जोडण्या सुरू कराव्यात....

 राज्यातील सर्व शाळांमध्ये सध्या परीक्षा चालू आहेत. त्यातच उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळांमध्ये वीज असणे आवश्यक आहे.


वीज जोडणी तोडलेल्या शाळांच्या बिलापोटी 14 कोटी 18 लाख रुपये महावितरणकडे शालेय शिक्षण विभागाकडून जमा करण्यात आले आहेत. 

त्यामुळे महावितरणने सर्व वीज जोडण्या सुरू कराव्यात असे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.


काय म्हणाल्या शालेय शिक्षण मंत्री- 

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, सध्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू आहेत. त्याचप्रमाणे उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळांमध्ये वीज असणे अत्यंत गरजेचे आहे. शालेय शिक्षण विभागाने वीजजोडणी तोडलेल्या शाळांच्या बिलापोटी 13 कोटी 18 लाख रुपये महावितरणकडे आज भरण्यात येत आहेत. त्यामुळे महावितरणने आज सर्व वीज जोडण्या सुरू करण्यात. वीज दराबाबत वीज नियामक आयोगाने शाळांसाठी जी वर्गवारी केली आहे. त्याच वर्गवारी मधील वीज जोडण्या आहे किंवा नाही याची तपासणी करून घेण्याबाबत महावितरणच्या क्षेत्रीय अधिकारी यांनी खात्री करून घ्यावी. अन्यथा तसा बदल करून शाळांना वीज देयक द्यावेत.

6682 शाळांची वीज जोडणी तोडली- राज्यात जिल्हा परिषदेच्या एकूण 60 हजार 801 शाळा असून, 56 हजार 235 शाळांमध्ये वीज जोडणी आहे. तर वीज जोडणी नसलेल्या शाळांची संख्या 4 हजार 566 आहे. 6 हजार 682 शाळांची वीज जोडणी तात्पुरती तोडण्यात आली असून, 14 हजार 148 शाळांची जोडणी कायमस्वरूपी तोडण्यात आली असल्याची माहिती यावेळी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


Thursday, 31 March 2022

 https://ghanshamarmal.blogspot.com

उन्हाळी सुट्टीबाबत व शाळा सुरु करणेबाबत – 

Summer holidays and Reopening school



राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची उन्हाळी सुट्टी व शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ सुरू करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी स्पष्ट केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील इ. १ ली ते ९ वी व इ. ११ वी च्या शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबत संदर्भीय शासन परिपत्रकान्वये सूचना देण्यात आलेल्या आहेत. संपूर्ण राज्यातील शाळांच्या कालावधीमध्ये एकवाक्यता व सुसंगती आणण्यासाठी सन २०२२ ची उन्हाळी सुट्टी व आगामी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये शाळा सुरू करण्याबाबत शासन स्तरावरून पुढील प्रमाणे शासन निर्णय / परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

१) सोमवार दि.०२ मे, २०२२ पासून उन्हाळी सुट्टी लागू करून सदर सुट्टीचा कालावधी रविवार दि. १२ जून, २०२२ पर्यंत ग्राहय धरण्यात येवून पुढील शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ मध्ये दुसरा सोमवार दि. १३ जून, २०२२ रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तसेच जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळयाच्या सुट्टी नंतर तेथील शाळा चौथा सोमवार दि. २७ जून, २०२२ रोजी सुरू होतील.

२) शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुटटी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्हयाच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक / माध्यमिक) यांच्या परवानगीने घ्यावी.

३) माध्यमिक शाळा संहिता नियम ५२.२ नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया ७६ दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.

(४) आगामी शैक्षणिक वर्षापासून यापुढे दरवर्षी राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा जून महिन्यातील दुस-या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) तसेच विदर्भातील तापमान विचारात घेता जून महिन्यातील चौथ्या सोमवारी (त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतरचा दिवस) जी तारीख असेल त्या तारखेपासून शाळा सुरू होतील.

सबब उपरोक्त बाबी विचारात घेवून वरील प्रमाणे उन्हाळी सुट्टी बाबत शासन निर्णय/ परिपत्रक निर्गमित करण्या बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

Tuesday, 1 February 2022

Nistha 3.0| निष्ठा३.० कोर्स 5 ते 8 लिंक| वेळापत्रक| मागील कोर्स माहिती| शासकीय शाळेतील सर्व शिक्षकांसाठी उपयुक्त|


https://ghanshamarmal.blogspot.com/2022/02/nistha-3.html




निष्ठा 3.0 (FLN)  प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नोंदणी करून प्रशिक्षण पूर्ण करणे बाबत.इयत्ता पहिली ते पाचवी या वर्गाला शिकवणाऱ्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांना निष्ठा 3.0 प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य आहे.   दीक्षा पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून प्रशिक्षणास जॉईन व्हावे.
तरी तात्काळ सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांनी दीक्षा ॲप / पोर्टलवर तात्काळ नोंदणी पूर्ण करून प्रशिक्षण पूर्ण करावे.

कोर्स 5


कोर्स 6


कोर्स 7


कोर्स 8


प्रशिक्षण वेळापत्रक

1.  दि. 01 जानेवारी ते 30 जानेवारी,2022

2.  दि. 31 जानेवारी ते 1 मार्च, 2022

3.   दि. 02 मार्च  ते 31 मार्च 2022

4.   दि. 01 एप्रिल ते 30 एप्रिल, 2022

टिप

वरील वेळापत्रकानुसार आपण जर दीक्षा ॲपवर निष्ठा प्रशिक्षणाची नोंदणी दिनांक 25 जानेवारी 2022 पर्यंत केलेली असेल व 25 जानेवारी पर्यंत जे मोडूल्स पूर्ण केलेले असतील अथवा ज्या मोडूल्सला सुरुवात केलेली असेल तेच मोडूल्स 30 जानेवारी 2022 पर्यंत पूर्ण करू शकले. 

ज्या मोडूल्सला आपण 25 जानेवारी 2022 पर्यंत सुरुवात केलेली नव्हती ते मोड्यूल आपण पूर्ण करू शकले नाही. 

वेळापत्रकानुसार आपण पूर्ण करू न शकलेले मोडूल्स आपणास 1 एप्रिल 2022 नंतर उपलब्ध होतील राहिलेले मोडूल्स व एप्रिल महिन्यामध्ये उपलब्ध होणारे मोडूल्स आपण 1 एप्रिल  ते 30 एप्रिल 2022 या दरम्यान पूर्ण करून प्रशिक्षण पूर्ण करू शकता. 🙏🏻



Tuesday, 25 January 2022

 "Happy Republic Day 2022" 

https://ghanshamarmal.blogspot.com

इतिहासात पहिल्यांदा अर्धा तास उशिरा सुरू होणार प्रजासत्ताक दिनाची परेड, काय आहे बरं कारण?



Republic Day 2022: भारत दरवर्षी 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा करतो. यंदा प्रजासत्ताक दिनाची परेड
(Republic Day Parade) सुमारे अर्धा तास उशिराने सुरू होणार आहे. इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा सकाळी दहाच्या नियोजित वेळेऐवजी सकाळी 10.30 वाजता प्रजासत्ताक दिनाची परेड सुरू होईल. अधिकाऱ्यांनी याचे कारण कोरोना प्रतिबंध (Corona restriction) आणि जम्मू-काश्मीरमध्ये प्राण गमावलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना श्रद्धांजली (Tribute to the security personnel) अर्पण करणे असल्याचे सांगितले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की "दरवर्षी प्रजासत्ताक दिनाची परेड (Republic Day Parade Time) सकाळी 10 वाजता सुरू होत असते परंतु यावर्षी ती सकाळी 10.30 वाजता सुरू होईल."

https://ghanshamarmal.blogspot.com

90 मिनिटांची असेल परेड

अधिकाऱ्याने पुढे सांगितले की "कोविड-19 निर्बंधांमुळे परेडला उशीर होईल. याशिवाय परेड सुरू होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये प्राण गमावलेल्या सुरक्षा जवानांनाही श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. हा परेड सोहळा गेल्या वर्षीप्रमाणे 90 मिनिटांचा असेल. त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) इंडिया गेटजवळील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देतील. यानंतर परेडमध्ये सहभागी होणारे दल मार्च करतील. ज्यात तिन्ही दलाचे जवान परेड करतील आणि देशाची सांस्कृतिक विविधता, सामाजिक आणि आर्थिक प्रगती दर्शविणारी चित्ररथ (Cultural scenes) दाखवले जाईल.

वरिष्ठ अधिकाऱ्याने पुढे सांगितले की "हे चित्ररथ लाल किल्ल्यापर्यंत जातील आणि तेथे सार्वजनिक प्रदर्शनासाठी उभी राहतील. परंतु मार्चिंग दल नॅशनल स्टेडियमवरच थांबतील. तसेच कोविड-19 संबंधित निर्बंधांमुळे प्रजासत्ताक दिनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणाऱ्या कलाकारांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जाणार नाही.

  🙏 घनशाम के. अरमळ
  जि.प.पु.मा.म.शाळा,तळणी
          ८८३०७६७३१२


Monday, 24 January 2022

 

राज्यात कुठे कधी शाळा सुरू होणार ?जिल्हानिहाय माहिती


https://ghanshamarmal.blogspot.com






राज्यातील 1 ली ते 12 वीच्या शाळा सुरू

जिल्हाकधीपासून, कोणत्या शाळा सुरू होणार?
लातूरसंपूर्ण जिल्ह्यात 1 ते 12 वी च्या शाळा उद्यापासून सुरु होणार
भंडाराशाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही
गोंदियाशाळा सुरु करण्यासंदर्भात तूर्तास निर्णय नाही
गडचिरोली24 जानेवारी पासून 5 ते 12 च्या
शाळा सुरू, 1 ते 4 थी पर्यंतच्या शाळा बंद
वर्धासंपूर्ण जिल्ह्यात 1 ते 12 वी च्या शाळा उद्यापासून सुरु होणार
अमरावतीपुढील एक आठवडा शाळा बंदच
यवतमाळ27 जानेवारी पासून 9 ते 12 च्या शाळा सुरु होणार, पहिले ते आठवीच्या शाळा बंदच
नांदेडउद्यापासून जिल्ह्यात 9 ते 12 विच्या शाळा सुरु होणार पहिले ते आठवीच्या शाळा बंदच
सातारा1 ते 12 विच्या शाळा उद्यापासून संपूर्ण जिल्ह्यात सुरु होणार
उस्मानाबाद10 आणि 12 वीचे वर्ग सुरु आहेत, इतर वर्गांबाबत 29 जानेवारीला निर्णय
बीड: अद्याप निर्णय नाही, आज रात्री उशिरा निर्णय घेतला जाण्याची शक्यता
अहमदनगर: शाळा सुरु करण्यासंदर्भात 25 जानेवारीला निर्णय होणार
परभणी: उद्यापासून 9 ते 12 वी पर्यंतच्या शाळा सुरू होणार, 8 वी पर्यंतच्या शाळा बंदच
हिंगोली: जिल्ह्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारीला निर्णय होणार
जालना: 24 जानेवारी पासून शहरी भागातील 8 ते 12 वी तर ग्रामीण भागातील 1 ते 12 वी शाळा सुरू होणार
वाशिम: जिल्ह्यात शाळा सुरु करण्यासंदर्भात 27 जानेवारी रोजी निर्णय होणार
अकोला: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 1 ते 12 च्या शाळा उद्यापासून सुरु होणार, शहरी भागातील शाळा तूर्तास बंद
बुलढाणा: शाळा सुरु करण्यासंदर्भात शासनाचा तूर्तास निर्णय नाही
नंदुरबार: 1 ते 4 थीच्या शाळा या ऑनलाइन सुरु राहणार, 5 ते 12 वी शाळा सुरू करण्याला परवानगी
धुळे: 8 ते 12 पर्यत च्या शाळा 27 जानेवारीला सुरु होणार, तूर्तास प्राथमिक शाळा बंद
सोलापूर: शाळा सुरु करण्यासंदर्भात प्रशासनाचा अद्याप निर्णय नाही
पालघर: 8 ते 12 वी पर्यंतच्या शाळा 27 जानेवारी पासून सुरु होणार, इतर वर्ग बंद
रायगड: शाळा सुरु करण्यासंदर्भात उद्या जिल्हाधिकारी निर्णय घेणार
रत्नागिरी: शाळा सुरु करण्यासंदर्भात 26 जानेवारी रोजी निर्णय
सिंधुदुर्ग: शाळा सुरु करण्या संदर्भात 1 फेब्रुवारीला निर्णय
चंद्रपूर: शाळा सुरु करण्या संदर्भात अजून निर्णय नाही
नागपूर: 26 जानेवारी रोजी आढावा घेऊन त्यानंतर निर्णय
सांगली: 1 फेब्रुवारी पासून शाळा सुरु होणार 1 ते 12 वी
कोल्हापूरकोल्हापूर : 25 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी
पुणेपुणे : शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढच्या आठवड्यात होणार
औरंगाबादफक्त दहावी आणि बारावीच्या वर्ग उद्यापासून उघडणार
जळगावग्रामीण भागातील शाळा सुरू होणार, शहरी भागातील तूर्तास बंद
नाशिक24 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी
ठाणे24 जानेवारीला शाळा सुरु होणार 1 ते 12 वी

https://ghanshamarmal.blogspot.com


 🙏🏻
घनशाम केशवराव अरमळ
जि.प.पु.मा.म.शाळा, तळणी
8830767312

Friday, 21 January 2022

 शैक्षणिक

निष्ठा 3.0 सर्व मॉड्युल लिंक,मार्गदर्शक व्हिडीओ व इतर सर्व माहिती


https://ghanshamarmal.blogspot.com/2022/01/3.html





शिक्षा मंत्रालय, नवी दिल्ली यांच्या मार्फत निष्ठा(National Initiatives for School Heads and Teachers Holistic Advancement) या एकात्ममक प्रशिक्षणाची सुरुवात दिनांक २१ ऑगस्ट, २०१९ रोजी करण्यात आली. यानुसार प्राथमिक स्तरावरील ऑनलाईन
स्वरूपामध्य प्रशिक्षण सन २०२० -२०२१ मध्य पूर्ण करण्यात आले. सध्या स्थितीत ऑनलाईन निष्ठा २.० प्रशिक्षण हे राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी सुरू आहे. सध्या दिनांक १ जानेवारी, २०२२ पासनू निष्ठा ३.० (FLN) प्रशिक्षणास सुरुवात करण्यात येत आहे.
NISHTHA हा राष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षण कार्यक्रम आहे. जो ऑनलाईन च्या माध्यमातनू राबवण्यात येत आहे.

दि.1 जानेवारी 2022 ते 30 जानेवारी 2022 निष्ठा 3.0 कोर्स लिंक्स

 शैक्षणिक

https://ghanshamarmal.blogspot.com/2022/01/blog-post_21.html

आंतरजिल्हा बदली बाबत महत्वाची माहिती|शासनाकडून आलेल्या सूचना


दि.21जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या बाबत स्पष्ट सूचना दिल्या आहेत कि , जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या या ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत .  शासन निर्णय दिनांक ७/४/२०२२ च्या शासन निर्णयान्वये धोरण निश्चित करण्यात आले आहे.
सन 2022 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत /आंतरजिल्हा बदल्या ऑनलाईन पद्धतीने करण्याबाबत सॉफ्टवेअर कंपनीची नियुक्ती करण्यात आली असून सदर कंपनीने बदल्या बाबतची कार्यवाही करण्याकरता कार्यपद्धती सुरू केलेली आहे. सन 2022 मध्ये करावयाच्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली यांकरिता शासन निर्णयामध्ये दिलेल्या सूचनेनुसार आपल्या अधिपत्याखाली प्राथमिक शिक्षकांच्या संदर्भात खालील प्रमाणे माहिती ची पूर्तता करण्यासंदर्भात सुचविण्यात आले आहे .

1)(बिंदुनामावली) विभागीय आयुक्त, मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेणे.
२) रोस्टर तपासणी करून घेतल्यानंतर रोस्टर निहाय रिक्त पदांची यादी .
जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांची आंतरजिल्हा बदली संदर्भात ऑनलाईन प्रक्रिया सुरु करत असताना खालील बाबींचा विचार करावा.

१) शिक्षणाचा हक्क अधिनियमातील तरतुदी विचारात घेऊन आंतरजिल्हा बदली करता पदोन्नत झालेल्या शिक्षकांनी स्वखुशीने पदावनत करण्याबाबत दिलेल्या संमती पत्राबाबत निर्णय घ्यावा.
२) संदर्भादिन शासन निर्णय सोबतच्या परिशिष्टातील अनुक्रम क्रमांक 6 येथे नमूद केल्यानुसार आंतर जिल्हा बदलीसाठी अर्ज करणारा शिक्षक स्थानिक अनुसूचित जमातीचा आहे किंवा कसे या बाबतची खात्री करूनच संमती देण्यात यावी.
वरील प्रमाणे कार्यवाही आपल्याकडून अद्याप झाली नसेल तर त्याबाबतची प्रक्रिया दिनांक 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत पूर्ण करण्याची दक्षता आपण घ्यावी.
आंतरजिल्हा बदलीचे परिपत्रक .